औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी ४८ लाखांचा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी ४८ लाखांचा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

“मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर ‘त्वचेचा रंग उजाळते‘ अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून १४ लाखांचा व नागपूर येथून ३४ लाखांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व औषध नियंत्रण प्राधिकारी दा.रा. गहाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १०६, अनुसूचीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याचे औषध निरीक्षक प्रशांत आस्वार व रासकर यांनी भिवंडी येथे तर नागपूर येथे औषध निरीक्षक महेश चौधरी यांनी साठा जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांनी औषधे व जादुटोणा आदी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ व नियम १९९५ आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ च्या तरतुदीचे उल्लंघन करणा-या जाहिराती प्रसिध्द करु नयेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास अन्न व औषध प्रशासनास हेल्पलाईन क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

First Published on: November 23, 2021 7:20 PM
Exit mobile version