Coronavirus: औरंगाबादमध्ये कोरोनाचे ५० नवीन रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा २८०६वर!

Coronavirus: औरंगाबादमध्ये कोरोनाचे ५० नवीन रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा २८०६वर!

पुण्याचा धोका वाढतोय; २४ तासांत आढळले २,६०१ रुग्ण, ४४ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७ हजार ९५८वर पोहोचला आहे. त्यापैकी ३ हजार ९५० जण मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचे ५० नवीन रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. यामध्ये १८ महिला आणि ३२ पुरुषांचा समावेश आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ८०६वर पोहोचला आहे. तर १ हजार ५०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नारेगाव (१), पवन नगर, टिव्ही सेंटर (२), एसटी कॉलनी, एन-२ येथे (१), सुतगिरणी गारखेडा परिसर (१), एन-११ येथे (१), गजानन नगर (४), एन-८, सिडको (३), कोतवालपुरा (१), आझाद चौक (१), एन-९ सिडको (१), नुतन कॉलनी(१), मंजुरपुरा (१), आसेफिया कॉलनी (१), सिटी चौर (१), कैलास नगर (१), गुलमंडी (१), मिल कॉर्नर (१), बारी कॉलनी (१), सिव्हील हॉस्पिटल परिसर (१), जनसिंगपुरा (१), छावणी (१), एन-६ सिडको, (२), बजाजनगर (२), अंबिका नगर (५), आंबेडकर नगर (६), हर्सुल परिसर (२), दुधड (४) अन्य (१) या भागातील आज कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये ३२ पुरुष आणि १८ महिलांचा समावेश आहे.

रविवारी खासगी रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला. यात बारी कॉलनी येथील ५२ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला ३१ रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू जहांगीर कॉलनी येथील ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा झाला. हा रुग्ण १२ रोजी रुग्णालयात भरती झाला होता. रविवारी सकाळी साडे दहा वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


हेही वाचा – Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ३२५ जणांचा मृत्यू तर ११,५०२ कोरोनाचे नवे रुग्ण!


 

First Published on: June 15, 2020 10:52 AM
Exit mobile version