राज्यात ५,०११ नवे रुग्ण, १०० जणांचा मृत्यू

राज्यात ५,०११ नवे रुग्ण, १०० जणांचा मृत्यू

corona Update: राज्यात आज ७ हजार ८६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात ५,०११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,५७,५२० झाली आहे. राज्यात ८०,२२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,२०२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात आज १०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १६, ठाणे ३, नाशिक ७, पुणे १५, पिंपरी चिंचवड मनपा ४, सोलापूर ८, नागपूर ८, भंडारा ६, चंद्रपूर ५ आणि अन्य १ असे आहेत. नोंद झालेल्या १०० मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३ मृत्यू पुणे ५, नाशिक ४, सोलापूर ४, ठाणे ३, भंडारा ३, बुलढाणा १, कोल्हापूर १, नंदूरबार १ आणि यवतमाळ १ असे आहेत.

आज ६,६०८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६,३०,१११ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७५ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९९,००,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,५७,५२० (१७.७५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७,५०,९९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: November 18, 2020 7:39 PM
Exit mobile version