मानव जातीच्या अविश्वसनीय मोहिमेचा ५०वा वर्धापन दिन

मानव जातीच्या अविश्वसनीय मोहिमेचा ५०वा वर्धापन दिन

मानव जातीच्या अविश्वसनीय मोहिमेचा ५०वा वर्धापन दिन

आपण आपल्याच जगात गुरफटलेलो असायचो. आपल्या सामाजिक, धार्मिक किंवा अगदी काळ्या-गोऱ्या भांडणात व्यग्र असायचो. याशिवाय आपलं दुसरं कुठलं जग असेल, याची शाश्वती देखील आपल्या नव्हती. अर्थात अध्यापही काही भागांत नाही. मात्र जग फार मोठं आहे. याची प्रचिती विज्ञानाचे आपल्याला करून दिली आणि विज्ञान फक्त त्यावरच थांबला नाही, तर त्याने जगाच्या वेगवेगळ्या टोकांना जोडून अंतर सुक्ष्म केले. मानवाच्या विज्ञानाच्या या कामगिरीचा आज फार मोठा ऐतिहासिक दिवस. आजच्याच दिवशी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले होते. मानव जातीच्या या पराक्रमाला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पराक्रमाचा गौरव गुगलनेही केले आहे. यासाठी गुगलने विशेष डुडल प्रदर्शित केले आहे, ज्यात मानवाने चंद्रावर पाऊल कसा ठेवला? याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

चंद्राच्या सौंदर्यावर अनेक कविता आहेत. मात्र या काल्पनिक जगाच्या पलीकडे जाऊन चंद्र मानव जातीसाठी खरच उपयोगी आहे का? याचं प्रात्यक्षिक अनुभव घेण्याचा विचारच फार भारी आहे. २० जुलै १९६९ रोजी कमांडर नील आर्मस्ट्राँग, कमांडर मॉडय़ुल, पायलट मायकेल कॉलिन्स, ल्युनर ज्युनियर, पायलट एडविन ई आल्ड्रिन हे चांद्रभूमीवर पोहोचले. साधारण दोन ते अडीच तास ते चंद्रावर थांबले होते. चंद्राची जमीन खोदून तेथील माती त्यांनी भरली. याशिवाय संशोधनास गरजेच्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सोबत घेतल्या. त्यानंतर ते पुन्हा पृथ्वीवर आले.

हेही वाचा – सोशल मीडिया ऑनर किलिंग थांबवेल?

नील आणि त्यांच्या टीमने केलेली ही ऐतिहासिक मोहिम होती. त्यानंतर चंद्रावर जाणं फारसं कुणाला जमलं नाही. नील हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव. त्यामुळे जगभरात नीलचे कौतुक केले जाते. आज नील हयात नाहीत. मात्र, आपल्या कर्तृत्वाने ते लाखो वर्ष लोकांच्या मनात राहतील, अशी कामगिरी त्यांनी केली आहे.

First Published on: July 19, 2019 8:01 AM
Exit mobile version