राज्यात ५,२२९ नवे रुग्ण, १२७ जणांचा मृत्यू

राज्यात ५,२२९ नवे रुग्ण, १२७ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

राज्यात ५,२२९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८,४२,५८७ झाली आहे. राज्यात ८३,८५९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १२७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४७,५९९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे.

राज्यात १२७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १४, ठाणे ३, नवी मुंबई मनपा ३, नाशिक ३, अहमदनगर १६, पुणे २२, पिंपरी-चिंचवड मनपा ३, सोलापूर ३, सातारा ४, सांगली ८, औरंगाबाद ५, जालना ३, उस्मानाबाद ८, नागपूर ९, भंडारा ४, गडचिरोली ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १२७ मृत्यूंपैकी ५७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४३ मृत्यू हे अहमदनगर १५, पुणे ८, नागपूर ५, सांगली ५, गडचिरोली ३, औरंगाबाद २, परभणी २, सातारा २ आणि यवतमाळ १ असे आहेत.

आज ६,७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत १७,१०,०५० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,११,३२,२३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,४२,५८७ (१६.५५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५,४७,५०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: December 4, 2020 7:47 PM
Exit mobile version