पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे ला होणार

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे ला होणार

येत्या २५ एप्रिलला होणारी इयत्ता पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक नवं परिपत्रक जारी करत या परीक्षा २३ मे होणार असल्याचं घोषित केलं आहे. १० एप्रिल २०२१ पर्यंत आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता आहे.

इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि आठवीची पू्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिलला होणार होती. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली होती. दरम्यान, आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक नवं परिपत्रक जारी केलं आहे. आता ही परीक्षा २३ मे रोजी घेण्यात येणार आहे. तसंच आवेदनपत्र भरण्याची तारीख देखील वाढवण्यात आली आहे. आता १० एप्रिल पर्यंत शाळा माहिती प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार आहे.

 

First Published on: March 30, 2021 5:49 PM
Exit mobile version