महाराष्ट्राची चिंता वाढली; ६ नवे करोनाग्रस्त रुग्ण; संख्या १७७ वर

महाराष्ट्राची चिंता वाढली; ६ नवे करोनाग्रस्त रुग्ण; संख्या १७७ वर

भारतात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित महिलेला पुन्हा कोरोनाचा संसर्ग, प्रकृती स्थिर

देशात करोनापासून मुक्तता मिळवण्यसाठी लॉकडउन जाहीर केले आहे. तर दुसरीकडे करोग्रस्त रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात करोनाचे सहा रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात करोनाचा आकडा १७७ वर गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात करोनाची संख्या १५९ वर होती. मात्र, आता ही संख्या वाढली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मुंबईत आज सकाळी पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या १५९ वरुन १७७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र, असे असताना देखील करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?

मुंबईत करोनामुळे एका संशयित डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या डॉक्टरांवर माहिममधल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली असून हे डॉक्टर ८२ वर्षाचे होते. दरम्यान, त्यांची Covid – 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकाच कुटुंबातील ६ जण पॉझिटिव्ह

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांचा नातू १२ मार्चला ब्रिटनहून परत आला होता. त्यानंतर त्याने स्वत:ली सेल्फ क्वॉरंटाइन केले होते. मात्र, तरी देखील त्यांच्या घरातील इतरांना देखील करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.


हेही वाचा – भारतात करोनाग्रस्तांची संख्या ८३४, तर १९ जणांचा मृत्यू


 

First Published on: March 28, 2020 12:05 PM
Exit mobile version