६२ वर्षीय वॉचमनचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

६२ वर्षीय वॉचमनचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

प्रातिनिधिक छायाचित्र

डोंबिवलीमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६२ वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ६२ वर्षीय वॉचमनला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तम निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. पीडिता गरोदर झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपी उत्तम निकाळजे हा डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर परिसरात एका सोसायटीत वॉचमन म्हणून काम करत होता. नराधम पीडित मुलीला चॉकलेट आणि पैसे देऊन तिच्यावर तो वयाच्या ११ व्या वर्षापासून बलात्कार करत होता. पीडित मुलगी गरोदर झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. आरोपीला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कल्याण-डोंबिवली वाढत्या गुन्हेगारींची शहरे

कल्याण-डोंबिवलीमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून त्यात बलात्काराच्या घटना गेल्या वर्षाच्या तुलनेने वाढल्या आहेत. यामुळे पोलिसांसमोर गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत. वाढती लोकसंख्या आणि अपुरे मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता आदी समस्यांचा सामना पोलिसांना करावा लागत आहे.

कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत आठ पोलिस स्टेशन आहेत. कल्याण परिमंडळात विनयभंगाच्या घटना कमी झाल्या असल्या तरी बलात्काराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २०१८ मध्ये ७४ बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. त्यात २०१९ मध्ये ५ ने वाढ झाली होती.

 

First Published on: February 24, 2020 9:27 PM
Exit mobile version