विरगावात कोरोनाचा शिरकाव; ६३ वर्षीय महिला कोरोनाबाधित

विरगावात कोरोनाचा शिरकाव; ६३ वर्षीय महिला कोरोनाबाधित
विरगाव : बागलाण तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतांना दिसून येत आहे. कोरोनाचा खेडेगावांत प्रसार होत असून येथेही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील विरगाव येथेही कोरोनाने शिरकाव केला असून येथील ६३ वर्षीय महिला रविवारी बाधित आढळून आल्याची माहिती विरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास देवरे यांनी दिली आहे. यामुळे गावात व परिसरात घबराट पसरली आहे.
विरगाव येथील कोरोनाबाधित महिलेला डायबिटीसचा त्रास होत असल्याने ती गावातीलच एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेत होती. नंतर सटाणा येथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर तिला नाशिक येथील नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे तिचा स्वॅब घेतला गेला. त्याचा अहवाल पाॉझिटिव्ह आला.

खबरदारीच्या उपाययोजना सुरू

अहवाल प्राप्त झाल्यानंतर विरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवरे यांनी ताबडतोब बाधित रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची माहिती घेत त्या कुटुंबातील ११ जणांना अजमेर सौंदाणे येथील कोविड सेंटरमध्ये कॉरंटाईन केले आहे. तर  ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात स्टॅनेटायझर व औषध फवारणी करण्यात येत असून विरगाव हे बाजारपेठेचे गाव असल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन संपूर्ण गाव तीन दिवसांसाठी तर विरगांव फाटा सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच ज्ञानेश्वर देवरे यांनी दिली आहे.
First Published on: August 2, 2020 8:26 PM
Exit mobile version