Corona : नाशिकमध्ये कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ३० हजारपार

Corona : नाशिकमध्ये कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ३० हजारपार

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.2३) 674 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण 246, नाशिक महानगर 362, मालेगाव 65 आणि जिल्ह्याबाहेरील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात ७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण २, नाशिक महानगर ३ आणि मालेगावमधील २ रूग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ३० हजारपार गेला आहे. जिल्ह्यात 30 हजार 9 वर पोहोचला आहे. एकट्या नाशिक शहरात 20 हजार 74 रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात आजवर 2४ हजार ३07 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण ५ हजार 763, नाशिक शहर १६ हजार 893, मालेगाव 1 हजार ४79 आणि जिल्ह्याबाहेरील १७२ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ४ हजार 934 रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण १ हजार 458, नाशिक शहर २ हजार 752, मालेगाव 714 आणि जिल्ह्याबाहेरील 10 रूग्ण आहेत. रविवारी दिवसभरात 832 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय १0, नाशिक महापालिका रूग्णालय 568, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय २४, मालेगाव रूग्णालय 46, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 184 रूग्ण दाखल झाले.

नाशिक कोरोना अपडेट

पॉझिटिव्ह रूग्ण-30,009 (मृत-768)
नाशिक ग्रामीण-7,433 (मृत-212)
नाशिक शहर-20,074 (मृत-42९)
मालेगाव शहर-2,298 (मृत-10५)
जिल्ह्याबाहेरील-20४ (मृत-22)

 

 

First Published on: August 23, 2020 9:08 PM
Exit mobile version