एसटीचे ७०० कर्मचारी मुंबईत होणार दाखल 

एसटीचे ७०० कर्मचारी मुंबईत होणार दाखल 

कोणत्याही संकट काळात नेहमी धावून येणारी लालपरीने पुन्हा मुंबईकरांचा मदतीला धावून आली आहे. कोरोना या महामारीत एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन विभागातून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने- आण करण्यासाठी विशेष फेऱ्या चालविणायत येत आहे. या व्यतिरिक्त आता रेल्वेतून मुंबई नागरिक दाखल होत आहे. तसेच सोमवारपासून बेस्ट कर्मचारी लॉकडाऊन आंदोलनाला जाणार आहे. त्यामुळे बसेस कमी पडू नयेत, याकरिता एसटी महामंडळाने विविध जिल्ह्यातून ७०० कर्मचारी यांना मुंबईत कर्तव्यावर बोलविण्यात आले आहे. शनिवारी सकाळपर्यंत हे ७०० कर्मचारी एसटी बसेस घेऊन एसटी जवान मुंबईत दाखल होणार आहे.

गेली ७२ वर्ष राज्याच्या सर्व सामान्य जनतेला सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा देणाऱ्या एसटीने वेळोवेळी आपले सामाजिक भान जपत, संकटात राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध घटकांना मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लाॅकडाऊन चार जाहीर केला आहे. गेल्या दोन महिन्यापासून या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे डाॅक्टर्स, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचा भार एसटी महामंडळावर देण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागामार्फेत शासनाच्या आदेशानुसार विशेष वाहतूक करण्यात येत आहे. त्याचबरोबर ९ मे पासून एसटीच्या बसेस आपल्या गावी जाण्याच्या ओढीने भर उन्हा-तान्हात कुटुंबासमवेत पायपीट करणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप सोडण्यासाठी धावत आहेत. गेल्या सहा दिवसांत राज्याच्या विविध भागातील तब्बल १ लाख ६ हजार २४ श्रमिक – मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. त्यासाठी एसटीच्या हजारो बहाद्दर चालकांनी अहोरात्र मेहनत करून ७२२७ बसेसद्वारे ही बहूमोल कामगिरी करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

लॉकडाऊन काळात मुंबई, ठाणे आणि पालघर विभागाचे एसटी कर्मचारी गाव खेड्यात अटकून पडले आहे. त्यामुळे या संकटकाळात एसटीची अखंडित सेवा सुरु राहावीत. याकरिता एसटी महामंडळाने सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, नाशिक अशा अनेक विभागाचे एसटीचे ७०० चालक आणि वाहकांना बोलविण्यात आले आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. तसेच कोरोनाचा भीतीमुळे गाव बंदी करण्यात आली आहे. अशा भीती सुद्धा लालपरीचे कर्मचारी आपली सेवा देण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीचा विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहे. त्यामुळे एसटीच्या याविशेष सेवांना अधिकगती देण्यासाठी ७०० कर्मचारी इतर विभागातून बोलविण्यात आले आहे.
– राहुल तोरो, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

First Published on: May 15, 2020 8:11 PM
Exit mobile version