राज्यात ७०८९ नवे रुग्ण, १६५ जणांचा मृत्यू

राज्यात ७०८९ नवे रुग्ण, १६५ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यात ५८ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात ७०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,३५,३१५ झाली आहे. राज्यात आज २,१२,४३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ५१४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यात १६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३६, ठाणे ४, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा १३, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा ४, रायगड १, नाशिक १, अहमदनगर ३, जळगाव १, पुणे ७, पिंपरी चिंचवड मनपा ५, सोलापूर ५, सातारा ९, सांगली ८, रत्नागिरी १०, औरंगाबाद ५, लातूर २, उस्मानाबाद ६, नांदेड २, अमरावती २, नागपूर ५ आणि अन्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १६५ मृत्यूंपैकी १०० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४४ मृत्यू ठाणे १२, पुणे ७, रत्नागिरी ७, नागपूर ५, सांगली ४, गडचिरोली ३, अमरावती २, बुलढाणा २, नांदेड १ आणि कर्नाटक १ असे आहेत.

आज १५,६५६ रुग्ण बरे होऊन घरी सोडले आहेत. राज्यात आजपर्यंत १२,८१,८९६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७६,९७,९०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,३५,३१५ (१९.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,२३,७९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: October 12, 2020 8:26 PM
Exit mobile version