CoronaVirus : उपनगरीय रुग्णालयातून ७५ रुग्ण बरे होवून घरी परतले!

CoronaVirus : उपनगरीय रुग्णालयातून ७५ रुग्ण बरे होवून घरी परतले!

कस्तुरबा रुग्णालयातून आतापर्यंत कोरोनाचे १०० रुग्ण बरे होवू घरी परतलेले असतानाच ‘कोविड- १९’चे उपचार सुरु उपनगरीय रुग्णालयांमधून आतापर्यंत एकूण ७५ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. यामध्ये जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालयातून सर्वाधिक ३० रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत सुमारे ४०० रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. मुंबईतील सर्वोपचार रुग्णालये (प्रमुख रुग्णालये), विशेष रुग्णालये यांच्यासह महापालिकेच्याच उपनगरीय रुग्णालयांमध्ये देखील ‘करोना कोविड -१९’ बाधित रुग्णांवर प्रभावी औषध उपचार नियमितपणे केले जात आहेत. या उपनगरीय रुग्णालयांमधून ‘कोरोना कोविड १९’चे ७५ रुग्ण आजवर बरे होऊन घरी परतले आहेत.

‘कोरोना कोविड -१९’चा संसर्ग झालेल्या आणि उपनगरीय रुग्णालयातील प्रभावी वैद्यकीय सेवेनंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजे ३० रुग्ण हे जोगेश्वरी परिसरात असणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील आहेत.‌ या खालोखाल कुर्ला परिसरातील खान बहादुर भाभा रुग्णालयातून २२, तर घाटकोपर मधल्या राजावाडी परिसरातील ‘सेट वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा रुग्णालयातून’ १८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

या व्यतिरिक्त कांदिवली पश्चिम परिसरातील ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातून’ ३ रुग्ण, तर वांद्रे पश्चिम परिसरातील खुरशादजी बेहरामजी भाषा रुग्णालयातून २ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यानुसार महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधून आजवर ७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याचेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

First Published on: April 21, 2020 10:51 PM
Exit mobile version