चिंताजनक : राज्यात पुन्हा संख्या वाढली, 24 तासांत 755 कोरोना बाधितांची नोंद

चिंताजनक : राज्यात पुन्हा संख्या वाढली, 24 तासांत 755 कोरोना बाधितांची नोंद

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांसाठी ही अतिशय चिंताजनक बाब आहे. राज्यात 24 तासांत 755 इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात कमी झालेल्या संख्येत आता पुन्हा एकदा वाढ होत आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात 1 हजार 165 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 79,60,298 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या 5 हजार 12 रूग्ण ॲक्टिव्ह आहेत.

राज्यासह मुंबईत सुद्धा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत सध्या 1 हजार 309 रूग्ण सक्रिय आहेत. तसेच मुंबईनंतर पुण्यात 1 हजार 183, ठाण्यात 962 कोरोनाचे रूग्ण सक्रिय आहेत.

देशात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांच्या वर गेली आहे. देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी देशात दिवसभरात 6 हजार 422 इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.


हेही वाचा : राज्यात 24 तासांत 881 कोरोना बाधितांची नोंद, तर 5 रुग्णांचा मृत्यू


 

First Published on: September 15, 2022 7:40 PM
Exit mobile version