Corona : नाशिकमध्ये ८२ टक्के रूग्ण कोरोनामुक्त

Corona : नाशिकमध्ये ८२ टक्के रूग्ण कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.2१) 746 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण 2१3, नाशिक महानगर 493, मालेगाव 37 आणि जिल्ह्याबाहेरील ३ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात 1० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण ३, नाशिक महानगर ५ आणि मालेगावमधील २ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात 2८ हजार ४२३ वर पोहोचला आहे. एकट्या नाशिक शहरात १९ हजार 83 रूग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात ८२ टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात आजवर 2३ हजार ३६5 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण ५ हजार २६५, नाशिक शहर १६ हजार 5०5, मालेगाव 1 हजार ४२४ आणि जिल्ह्याबाहेरील १७१ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ४ हजार ३०३ रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण १ हजार 463, नाशिक शहर २ हजार १५४, मालेगाव 678 आणि जिल्ह्याबाहेरील 8 रूग्ण आहेत. शुक्रवारी दिवसभरात 1 हजार ५० संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय १२, नाशिक महापालिका रूग्णालय ६७४, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय २०, मालेगाव रूग्णालय 37, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 307 रूग्ण दाखल झाले.

नाशिक कोरोना अपडेट

पॉझिटिव्ह रूग्ण-28, 423 (मृत-755)
नाशिक ग्रामीण-6935 (मृत-207)
नाशिक शहर-19,083 (मृत-424)
मालेगाव शहर-2204 (मृत-102)
जिल्ह्याबाहेरील-201 (मृत-22)

 

First Published on: August 21, 2020 8:55 PM
Exit mobile version