हळदी-कुंकू कार्यक्रमाला गेली; घरी परतली आणि…

हळदी-कुंकू कार्यक्रमाला गेली; घरी परतली आणि…

हळदी-कुंकू कार्यक्रमाला गेली; घरी परतली आणि...

मकरसंक्रांतीच्या दिवसानंतर घरोघरी हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. बऱ्याच महिला हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमात मग्न झाल्या असून नटून थटून आपल्या सहकाऱ्यांकडे जात आहेत. दरम्यान, हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमाला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. एक महिला हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी घरी गेली होती. घरी आल्यावर त्या महिलेला घरातील दृश्य पाहून धक्काच बसला.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; पिंपरी-चिंचवडमधील चिंचवडेनगरमध्ये राहणारी महिला सुनीता यादव आपल्या मालकीणीकडे हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. तर त्यांचे पती बापूराव यादव हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नव्हते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करत घरातून तब्बल ८२ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड लंपास केली. सुनीता सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. याप्रकरणी बापूराव यादव यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – भयंकर! खाऊसाठी ५ रुपये मागितले, म्हणून माथेफिरू पित्याने चिमुरडीला आपटून केले ठार


 

First Published on: February 5, 2021 3:07 PM
Exit mobile version