चिंताजनक! सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे ८९ पोलिसांचा मृत्यू

चिंताजनक! सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे ८९ पोलिसांचा मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

राज्यात सप्टेंबर महिन्यांत कोरोनामुळे ८९ पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यात दहा पोलीस अधिकारी आणि ७९ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहेत. एकाच महिन्यात ८९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात २२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर २०६ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २ हजार ९५६ पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरापर्यंत राज्यात २३ हजार ५४८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली होती. त्यात २ हजार ५८३ पोलीस अधिकारी तर २० हजार ९६५ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता. बुधवारी दिवसभरात २२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर २०६ पोलीस कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांची संख्या २० हजार ३४५ झाली आहे. त्यात २ हजार १९५ पोलीस अधिकारी आणि १८ हजार १५० पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

सध्या राज्यात २ हजार ९५६ पोलिसांवर उपचार सुरु आहेत. त्यात ३६३ पोलीस अधिकारी आणि २ हजार ५९३ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. एका पोलीस अंमलदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत २४७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात २५ पोलीस अधिकारी तर २२२ पोलीस कर्मचारी आहेत. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत ३६९ पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात ८९८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

कोविडसंदर्भात आतापर्यंत १ लाख १३ हजार ५७८ कॉल मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहेत. लॉकडाऊननंतर राज्यात १ हजार ३४७ अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यात ३८ हजार ५५४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९६ हजार ४८५ वाहने जप्त केली आहेत. त्यांच्याकडून २९ कोटी १२ लाख २७ हजार ९९२ रुपयांचा दंड वसुल केला आहे.

 

First Published on: October 1, 2020 10:51 PM
Exit mobile version