होळीनिमित्त कोकणसह ‘या’ भागांसाठी मध्य रेल्वेच्या ९० विशेष गाड्या

होळीनिमित्त कोकणसह ‘या’ भागांसाठी मध्य रेल्वेच्या ९० विशेष गाड्या

मध्ये रेल्वेन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने होळी सणासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ९० विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मुंबई ते सुरतकल दरम्यान ६ होळी विशेष चालवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दादर आणि बलिया/गोरखपूर दरम्यान ३४ होळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, नागपूर आणि मडगाव दरम्यान १० हॉलिडे स्पेशल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (90 special trains of Central Railway on the occasion of Holi)

होळी सणासाठी अनेकजण आपल्या गावची वाट धरतात. त्यामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गर्दी जमते. त्यामुळे प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेत लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर/मडगाव, पुणे – दानापूर/अजनी/करमळी आणि पनवेल – करमळी दरम्यान अतिरिक्त ३४ होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तसेच, पूर्व मध्य रेल्वेने मुंबई आणि जयनगर दरम्यान ६ होळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे या वर्षी घोषित होळी विशेषची एकूण संख्या ९० आहे.

३४ होळी विशेष गाड्यांचे तपशील

१. लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (४ सेवा)

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर.

२. पुणे – दानापूर साप्ताहिक होळी विशेष (२ सेवा)

थांबे: दौंड कॉर्ड मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.

३. पुणे – अजनी साप्ताहिक एसी सुपरफास्ट स्पेशल (६ सेवा)

थांबे: दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

४. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष (६ सेवा)

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.

५. पुणे – करमळी साप्ताहिक विशेष (६ सेवा)

थांबे: लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.

६. पनवेल – करमळी साप्ताहिक विशेष (८ सेवा)

थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.

विशेष गाडी क्र. 01043, 01123, 01443/01444, 01459/01460 आणि 01447/01448 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २४.२.२०२३ रोजी सुरू होतील आणि 01445/01446 साठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irct.co.inc.in या संकेतस्थळावर आधीच उघडले आहेत. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.


हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार

First Published on: February 23, 2023 6:23 PM
Exit mobile version