नाशिकमध्ये ९५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये ९५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

30 negative reports in Jayakheda; One interrupted

नाशिक जिल्हा प्रशासनास सोमवारी (दि.२२) दिवसभरात ९५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक शहर ७४, नाशिक ग्रामीण २० आणि जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यात १० बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ६, नाशिक ग्रामीण ३ आणि जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नाशिक महापालिकेच्या नगरचना विभागात करोनाने शिरकाव केला असून एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ८६१ रूग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात १ हजार २८३ रूग्ण आहेत.

नाशिक शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावारण आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक शहरात व्यापार्‍यांसह नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळण्यास सुरूवात केली आहे. जिल्हा प्रशासनास सोमवारी दुपारी २.१० वाजता ६२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये देवळाली १, आडगाव १, दिंडोरी २, सिन्नर ६, इगतपुरी २, पिंपळगाव बसवंत १ आणि निफाडमधील एकाचा रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात २ हजार ८१४ बाधित रूग्ण असले तरी १ हजार ६७४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण २९९, नाशिक शहर ५३३, मालेगाव ७८२ व जिल्ह्याबाहेरील ६० रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ९६५ बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यात नाशिक ग्रामीण २३९, नाशिक शहर ६३५, मालेगाव ७६ व जिल्ह्याबाहेरील १५ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक महापालिकेतील कर्मचारी पॉझिटिव्ह
नाशिक महापालिकेच्या नगरचना विभागात करोनाने शिरकाव केला असून सोमवारी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कर्मचार्‍याचा भाऊ करोनाबाधित असल्याचे बोलले जात आहे. कर्मचारी चार दिवसांंमध्ये कोणाच्या संपर्कात आला आहे, याचा शोध आरोग्य विभागातर्फे घेतला जात आहे.

४४२ अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात सोमवारअखेर १७ हजार ७६७ संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये २ हजार ८१४ रूग्ण पॉझिटिव्ह, १४ हजार ५११ रूग्ण निगेटिव्ह असून ४४२ रूग्णांचा अहवाल प्रलंबित आहे. यात नाशिक ग्रामीण ६६, नाशिक शहर १७४, मालेगाव २०२ रूग्णांचा समावेश आहे.

३०३ संशयित रूग्ण दाखल
आरोग्य विभागाने करोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रूग्णांना रूग्णालयांमध्ये दाखल केले आहे. जिल्हा रूग्णालय १६, नाशिक महापालिका रूग्णालये २२४, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ४, मालेगाव रूग्णालय १ आणि नाशिक ग्रामीण रूग्णालयात ५८ रूग्ण दाखल झाले आहेत.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह-२८६१(मृत-१७५)
नाशिक शहर-१२८३ (मृत-६८)
नाशिक ग्रामीण-५६४ (मृत-२६)
मालेगाव-९२९ (मृत-७१)
अन्य-८५ (मृत १०)

First Published on: June 22, 2020 8:39 PM
Exit mobile version