औरंगाबादकरांची चिंता वाढली! जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तीन हजार पार!

औरंगाबादकरांची चिंता वाढली! जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तीन हजार पार!

कोरोना व्हायरस

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दररोज औरंगाबादमध्ये ९० हून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढताना दिसत आहे. आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ९६ कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा तीन हजार पार झाली आहे. आज आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ५७ पुरुष आणि ३९ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार २८वर गेला आहेत. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात १६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ हजार ६५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत असून १ हजार २०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या भागातील आज कोरोनाबाधित रुग्ण आढळले

राजीव नगर (१), पेंशनपुरा (१), भवानी नगर (१), रेहमानिया कॉलनी (१), मसून नगर (१), पुष्प गार्डन (१), गजानन नगर (१), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (१), सेव्हन हिल (१), हडको (१), जटवाडा रोड (१), बीडबायपास (१), ठाकरे नगर (१), न्यू एसटी कॉलनी, एन दोन सिडको (१), मनजीत नगर (१), शंभू नगर, गारखेडा (१), ब्रिजवाडी (१), शहानूरवाडी (१), यशोधरा कॉलनी (१), गुलमंडी (१), पद्मपुरा (१), उस्मानपुरा (१), शिवशंकर कॉलनी (१), बेरी बाग (१), राजनगर (१), उत्तम नगर (१), जवाहर कॉलनी (१), ज्योती नगर (१), सिडको (१), हनुमान नगर (१), सातारा परिसर (१), न्यू हनुमान नगर (१), मयूर नगर (१), राहुल नगर (१), बजाज नगर (१), संभाजी कॉलनी (१), संजय नगर (१), आयोध्या नगर,सिडको (१), मोतीवाला नगर (१), औरंगपुरा (१), अन्य (१) विश्वभारती कॉलनी (१) आणि रांजणगाव, शेणपूजी (१), चिकलठाणा (1), समता नगर (२), पळशी (२), एसआरपीएफ कॉलनी (२), एन आठ सिडको (५), नारेगाव (३), जयभवानी नगर (२), एन नऊ सिडको (३), जुनी मुकुंदवाडी,विठ्ठल मंदिर जवळ (२), न्यू विशाल नगर (५), नागेश्वरवाडी (२), समर्थ नगर (१०), रमा नगर (२), विश्रांती नगर (३), सिडको वाळूज महानगर दोन (२), बजाज नगर, गुलमोहर कॉलनी (२), शिवाजी नगर (३), गारखेडा (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३९ स्त्री व ५७ पुरूष आहेत.


हेही वाचा – Coronavirus: जगात २४ तासांत १.४२ लाखांहून अधिक नवे कोरोनाचे रुग्ण!


 

First Published on: June 17, 2020 9:47 AM
Exit mobile version