डोंबिवलीत ९९ वर्षाच्या आजीसह नातीने बजावला मतदानाचा हक्क

डोंबिवलीत ९९ वर्षाच्या आजीसह नातीने बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणूकीतील आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या दरम्यान डोंबिवलीमध्ये द्रौपदाबाई सखाराम म्हात्रे या ९९ वर्षाच्या आजीने नाती पूर्वीता गोरखनाथ म्हात्रे हिच्यासह मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे पूर्वीता ही नवमतदार असून तिने आजीबरोबर पहिल्यांदाच मतदान केलं. आजी आणि नातीचा हा उत्साह डोंबिवलीत मतदान केंद्रावर मतदारांना पहावयास मिळाला. यावेळी वडील गोरखनाथ म्हात्रे आणि आई कविता म्हात्रे अशा म्हात्रे कुटूंबियांने सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला. डोंबिवली पश्चिमेतील पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयात त्यांनी आपले मतं देऊन हा मतदानाचा हक्क बजावला.

डोंबिवलीतील १० मतदान केंद्रात सुरुवातीला ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे या मशीन नादुरुस्तीमुळे मतदारांना मतदान करण्यासाठी खूप वेळ रांगेत उभे राहावे लागले तसेच यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे यांना मतदानापासून वंचीत राहावे लागले. काही मतदान केंद्रात मतदारांसाठी भर उन्हात पिण्याच्या पाण्याची सोय देखील नव्हती. त्यामुळे मतदारांमध्ये निरुत्साहाचे वातावरण बघायला मिळले.

First Published on: April 29, 2019 8:12 PM
Exit mobile version