शिवरायांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज संभाजीनगरमध्ये बंदची हाक

शिवरायांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज संभाजीनगरमध्ये बंदची हाक

संभाजीनगर – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आज संभाजीनगर बंदची हाक देण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली संभाजीनगर बंद पुकारण्यात आला आहे.

शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी संभाजीनगर बंदची हाक दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाचाही त्यांनी निषेध केला आहे.

जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे आज संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुकाने आणि बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्या काळाती आदर्श होते, आताचे आदर्श नितीन गडकरी आहेत, असं म्हटलं होतं. तर, दुसरीकडे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनीही औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती, असं म्हटलं होतं.

First Published on: November 22, 2022 10:47 AM
Exit mobile version