कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबासाठी गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय

कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबासाठी गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या काळात कर्तव्य बजावताना आपला जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटूंबासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. या कुटुंबांना सरकार ६५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवाय त्यांना सेवानिवृत्तीच्या कालावधीपर्यंत सरकारी निवासस्थानात राहता येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी याची घोषणा केली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी व्हिडिओ शेअर करत या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की कोरोनामुळे बळी गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना सरकार मदत करणार आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपला जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना त्यांच्या डोक्यावर असलेल्या छताची चिंता करण्याची गरज नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस कुटुंबातील सदस्य निवृत्त कालावधीपर्यंत सरकारी घरात राहू शकतात, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

 

 

First Published on: June 26, 2020 11:34 AM
Exit mobile version