पुण्यातही होऊ शकते जमावबंदी लागू; अजित पवार यांनी दिले संकेत

पुण्यातही होऊ शकते जमावबंदी लागू; अजित पवार यांनी दिले संकेत

कोरोना व्हायरस

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवेंसदिवस वाढत चालला असून त्यामध्ये पुणे जिल्हा अग्रेसर आहे. पुण्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असून मुंबईप्रमाणे पुण्यातही जमावबंदी लागू होण्याची शक्यता आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करून प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे अजित पवार यांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरतील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत म्हटले आहे.

पुणे येथील विधानभवन सभागृहात आज, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार यांनी दिलेल्या सुचना 

हेही वाचा –

Maratha Reservation: ‘…तर कोणत्याही परिस्थितीत मी राजीनामा देणारच’

First Published on: September 18, 2020 5:55 PM
Exit mobile version