‘त्या’ अपघातस्थळी चार वर्षांपासून केली जातेय गतिरोधकाची मागणी

‘त्या’ अपघातस्थळी चार वर्षांपासून केली जातेय गतिरोधकाची मागणी

नाशिक : पंचवटी विभागातील आरटीओ कॉर्नर ते तारवालानगर चौफुली, दिंडोरी रोड, मोरेमळा चौफुली, मिर्ची हॉटेल सिग्नल या ठिकाणी नेहमी जीवघेणे अपघात होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतीरोधक टाकावेत, अशी मागणी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह नगरसेवक व नागरिकांनी २०१८ पासून वारंवार पोलीस, महापालिका व इतर यंत्रणांकडे केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या शहर अभियतांनी जिल्हाधिकार्‍यांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यास अद्यापपावेतो प्रतिसाद मिळालेला नाही.

पंचवटी विभागातील आरटीओ कॉर्नर ते तारवालानगर चौफुली, दिंडोरी रोड, मोरेमळा चौफुली, मिर्ची हॉटेल सिग्नल या ठिकाणी जीवघेणे अपघात झाले आहेत. या अपघात अनेक प्रवाशी व चालक मृत्यूमुखी पडले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. तारवालानगर चौफुलीवर गतीरोधक टाकण्याबाबत प्रभागातील माजी नगरसेवक उद्धव निमसेंसह इतर नगरसेवक व नागरिकांनी २६ जानेवारी २०१९ रोजी रस्ता रोको आंदोलन केले होते. याप्रकरणी शहर वाहतूक शाखा, पंचवटी पोलीस ठाणे व परिसरातील नागरिकांची मागणी आहे. याप्रकरणी महापालिकेमार्फत सहायक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक शाखेस पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार, महापालिकेच्या शहर अभियत्यांनी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी जानेवारी २०१९ मध्ये जिल्हाधिकारी तथा रिजनल ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीचे अध्यक्षांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

First Published on: October 10, 2022 12:27 PM
Exit mobile version