ठाण्यात तीन मजली इमारतीला आग, अग्निशमन दलाकडून १५ जणांची सुखरूप सुटका

ठाण्यात तीन मजली इमारतीला आग, अग्निशमन दलाकडून १५ जणांची सुखरूप सुटका

ठाणे – सेंट जॉन स्कूलच्या समोर असलेल्या तळ अधिक तीन मजली गुरूप्रेरणा या इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत त्यांची सुखरूप सुटका केली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांचे मार्फत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०३-फायर वाहन व ०१-रेस्क्यू वाहन व ०१-वॉटर टँकरसह, ०१- जंबो वॉटर टँकरला पाचारण केले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

First Published on: February 16, 2023 9:08 AM
Exit mobile version