आरोग्य विद्यापीठाने साकारले पंचेंद्रियांना समर्पित उद्यान

आरोग्य विद्यापीठाने साकारले पंचेंद्रियांना समर्पित उद्यान

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आपल्या कॅम्पसमध्ये रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श असे पंचज्ञानेंद्रियांना समर्पित संवेदना उद्यान साकारले आहे. या उद्यानाचे लोकार्पण विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जनरल माधुरी कानिटकर (नि.) यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला प्रतिकुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, प्रमुख अतिथी म्हणून चेन्नई येथील कर्मचारी राज्य विमा निगम महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, ले. जनरल डॉ. राजीव कानिटकर (नि.), ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद पिंपरीकर, डॉ. शुभांगी पिंपरीकर, अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार झा, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे, डॉ. संजय नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मेडिकल टुरिझमच्या अनुषंगाने विद्यार्थी व अभ्यागतांना संवेदना उद्यानातील वृक्षांची माहिती व मांडणी केलेली आहे. तसेच, संवेदना उद्यान पर्यावरण व स्वास्थ्यासाठी सर्वांसाठी उपयुक्त आहे. विद्यापीठात ग्रीन कॅम्पस उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली असल्याचे कुलगुरू कानिटकर यांनी सांगितले. प्रतिकुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ म्हणाले की, विविध वृक्ष, फुलझाडे यांचे वर्गीकरण करुन करुन या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. जीवनात आत्मा, मन व इंद्रीय यांचे महत्व अधिक आहे. या तत्वांचा वापर करुन उद्यानात वृक्षलागवड करण्यात आली आहे. संवेदना उद्यानात लागवड करण्यात आलेली वृक्ष परिसरात वावरताना ध्वनी, गंध इ. इंद्रियांना प्रभावित करतील अशी संकल्पना या उद्यानाच्या उभारणीमागे आहे.

डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या ग्रीन कॅम्पस उपक्रमांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संवेदना उद्यानाकरीता परिश्रम घेतले आहेत. उद्यानात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची काळजीपूर्वक जोपासणा करण्यात आली आहे. संवेदना उद्यानाच्या निर्मितीत काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. प्रास्ताविक डॉ. सुनील फुगारे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपकुलसचिव डॉ. संजय नेरकर यांनी आभार मानले.

गंध उद्यानात या वनस्पतींची लागवड

कुडा, चित्रक, मेहंदी, निरगुडी, हेन्कल, अडुळसा, प्लंबेगो, अबोली, कोरंटी, कुफीया, मुसांडा, कबवासी, जाटारोफा, अ‍ॅलिसम, एक्सझोरा, धायटी, पारिजातक, अंकोल, मुचकूंद, टीकोमा, रातराणी, मधुकामिनी, मोगरा, हिबिक्सस, गावरान गुलाब, अनंता, जाई, जुई, रानजुई, कुंदा, सोनचाफा, सितारंजन, लेमनग्रास, मारवा

रुची उद्यानातील वृक्ष व वनस्पती

फालसा, धामणी, अटरुन, भोकर, शिवण, जंगली अजान, अ‍ॅपल बोर, चोरोळी, सिताफळ, पेरु, अंजीर , आंबा, नारळ, चिकु , गोरख चिंच, फणस, सुपारी, मरुड शेंग, रामफळ, निंबु, संत्रा, डॅऋगन फुड, चेरी, मोसंबी, जांभुळ, चिंच, डाळींब. श्रवण उद्यानातील वृक्ष व वनस्पती गोल्डन बांम्बु, मारवेल बांम्बु, पम्पस गा्रस, सादडा

First Published on: February 6, 2023 12:41 PM
Exit mobile version