नाशकात शिंदे गटाला धक्का; जिल्हाध्यक्ष पराभूत

नाशकात शिंदे गटाला धक्का; जिल्हाध्यक्ष पराभूत

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांचा पराभव झाला असून दिंडोरी तालुक्यातील तळेगावच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेनंतर हा पहिलाच मोठा पराभव असल्याचे बोलले जात आहे.

दिंडोरी तालुक्यात 50 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. रविवारी मतदान झाल्यानंतर सामेवारी सकाळपासून मतमोजणीला सुरवात झाली. सुरुवातीपासूनच दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी आघाडीवर राहिली आहे. अशातच दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील नवनियुक्त शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हे सरपंच पदासाठी उभे होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर या उभ्या ठाकल्या होत्या. अखेर शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून तळेगाव ग्रापंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर विराजमान झाल्या आहेत.

स्वराज्यने उघडले खाते

 राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने खाते उघडले आहे. येथील रूपाली ठमके यांनी सरपंच म्हणून विजय मिळवला. ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमके यांना स्वराज्य संघटनेच्या पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले होते. स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसला तरी स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामे केले होते. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील बहुतांश ठिकाणी स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले आहेत. त्यापैकी गणेशगाव येथे सरपंचपदासाठी रूपाली ठमके यांचा विजय झाला आहे.
याशिवाय राजेवाडी, गंगावरे-सावरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती.
रूपाली ठमके यांच्या रूपाने स्वराज्य संघटनेला पहिली सरपंच महिला निवडून येण्याचा मान मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

First Published on: September 20, 2022 1:34 PM
Exit mobile version