दहावीच्या विद्यार्थाचा जीभ कापून केला खून!

दहावीच्या विद्यार्थाचा जीभ कापून केला खून!

दहावीची परीक्षा देऊन घरी परतनाऱ्या एका विद्यार्थाचा खून झाल्याची धक्कादायक घटना गोंदिया तालुक्यात घडली आहे. मंगळवारी पेपर देऊन येत असताना अतुल अशोक तरोणे या १७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आला आहे. सायंकाळी पेपर देऊन घरी परतत असताना, विद्यार्थ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र, हा हल्ला इतका घातक होता की यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

कसा केला हल्ला?

मंगळवारी दहावीच्या विद्यार्थांचा पहिला पेपर होता, पेपर देऊन घरी परतत असताना या विद्यार्थ्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी आधी विद्यार्थ्याच्या डोक्यावर, शरीरावर चाकूने वार केले आणि हे कुठेही सांगू नये यासाठी त्याची जीभही कापण्यात आली. हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  मात्र या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. विद्यार्थ्यावर हल्ला झाल्यानंतर तेथील नागरिकांनी गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर त्याचा मृतदेह गोंदीयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. याप्रकरणी आरोपी कोण आहे हे अजून कळू शकले नाही. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

First Published on: March 4, 2020 3:25 PM
Exit mobile version