शाळांप्रमाणे एसटी आगारात होणार प्रार्थनेचा गजर, ठाण्यात आरटीओचा अनोखा उपक्रम

शाळांप्रमाणे एसटी आगारात होणार प्रार्थनेचा गजर, ठाण्यात आरटीओचा अनोखा उपक्रम

शालेय जीवनात शाळेत गेल्यावर आपण प्रार्थना म्हटली आहे. मात्र आता ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने एसटी चालक वाहकांसाठी एक अनोखी आणि हटकेच प्रार्थना तयार केली आहे. ही प्रार्थना जबाबदारीची. ही प्रार्थना कर्तव्यावर रुजू होताना म्हणायची आहे. त्यामुळे आपली जबाबदारी नेमकी काय आहे. याची जाणीव मणी बागळून ही जोडगोळी लालपरीचा प्रवास हा सुखाचा आणि आणखी सुरक्षित कसा करतील हा उद्देश आहे. यामुळे अपघाताच्या मालिकेला निश्चितच ब्रेक बसेल असा आरटीओला विश्वास आहे. या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रातील सर्वप्रथम ठाण्यात झाला आहे. शुक्रवारी ठाण्यातील खोपट येथील एसटी बस आगारात डिजिटल प्रार्थना फलक बसवून त्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

ठाणे शहरात नाहीतर राज्य भर पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या मार्फत सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत नवनवीन उपक्रम दरवर्षी राबविले जात आहेत. असाच एक अनोखा उपक्रम ठाणे आरटीओ विभागाने लालपरीच्या जबाबदारीबरोबर लाखो प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास करणाऱ्या चालक आणि वाहकांसाठी हाती घेतला आहे. तो म्हणजे जबाबदारीच्या प्रार्थनेचा. आता तुम्ही म्हणाल प्रार्थना करायला ते काय शाळेत जातात काय? तर नाही. पण, लाखो जीव घेऊन शे-हजारो किलोमीटर जाणाऱ्या चालक आणि वाहक या जोडगोळीला फक्त त्यांच्या जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्य काय आहेत. हेच नेहमी लक्षात राहावे. यासाठी आहे. त्यामुळे लालपरी आणि प्रवासी यांचे नाते कधीच तुटणार नाही. आणि कमी होणारी प्रवासी संख्या कमी होणार नाही, पण ती यामुळे निश्चित वाढण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत.

ही संकल्पना ठाणे आरटीओ विभागाचे सहायक परिवहन अधिकारी विजय शेळके याची असून तिला प्रत्यक्षात ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी प्रत्यक्षात आणली आहे. त्यानुसार डिजिटल फलक तयार केले असून त्यांच्यावर ती प्रार्थना सुस्पष्ट दिसेल अशी रेखाटली असून तो फलक आगारात लावण्यात आलेली आहे. आज त्या प्रार्थना फलकाचे शुभारंभ झाले असून त्याचा श्रीगणेशा झाला आहे. तर आता प्रार्थना वाचनाचा गजर होणार आहे. त्यामुळे आता या जोडगोळी कडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, एसटी विभाग नियंत्रक विलास राठोड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके,  प्रसाद नलावडे, गणेश पाटील, शहर वाहतूक शाखेचे सपोनि पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पूर्वी एसटी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण अधिक असायचे. मात्र, गेल्या काही वर्षात झालेल्या अपघातांच्या तुलनेत एसटी बस अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे, लालपरी वरील विश्वाहर्ता आणखी वाढेल आणि अपघात विरहीत करण्यासाठी निश्चित याचा फायदा होईल. या श्रेयाचे मुकुट चालक वाहकांच्या डोक्यावर राहील. यामध्ये शंकाच नाही. आता जबाबदारी ही त्या दोघांची आहे.

– जयंत पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, ठाणे आरटीओ

First Published on: February 3, 2023 10:47 PM
Exit mobile version