शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गौळणे शिवारात घडली. प्रवीण संपत घयावट (३५, रा. गौळणे, नाशिक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण घयावट यांचा पाय घसरल्याने ते शेततळ्यात पडले. माशांना पकडण्यासाठी ठेवलेल्या जाळ्यांमध्ये त्यांचे दोन्ही हात अडकले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

First Published on: April 10, 2024 4:36 PM
Exit mobile version