आधार कार्ड, रेशन कार्ड वाडीवस्तीवर मिळणार

आधार कार्ड, रेशन कार्ड वाडीवस्तीवर मिळणार

आदिवासी वाडीत राहणा-या नागरीकाकडे पुराव्याचा तगदा न लावता कमीत कमी व सहज उपलब्ध होतील अशा पुराव्यांच्या आधारे वाडीवस्तीवर आमच्या प्रशासनाच्सा वतीने रेशन कार्ड, आधार कार्ड पोहचवीले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे. असेच कर्जत तमनाथ व शिरसे वाडीत ज्या कातकरी कुटुंबाना अद्याप रेशन कार्ड मिळालेली नाहीत अशा कुटुंबांना पुढील आठ दिवसात रेशन कार्ड बनवून देण्याचे आदेश तालुका प्रशासनाला जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.

1 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने कर्जत तालुक्यातील तमनाथ आदिवासी वाडीमध्ये कातकरी उत्थान आभियाना अंतर्गत जातीचे दाखले वाटपाच्या शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात मार्गदर्शन करताना जिल्हाधाकारी बोलत होते.

ग्रामपंचायत शिरसे व संतोष भोईर मित्रमंडळाच्या वतीने 5, 6 व 7 जुलै रोजी तमनाथ येथे कातकरी उत्थान अभियानामार्फत विविध शासकीय दाखले वाटप शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात प्रात झालेल्या कातकरी कुटुंबांच्या जातीच्या दाखल्याच्या अर्जावर कार्यवाही करून तयार केलेले व लँमीनेशन केलेले जातीचे दाखल्याचे वाटप करण्यात आले. महसूल दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय, दिशा केन्द्र व शिरसे ग्राम पंचायतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या दाखले वाटप शिबारास जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधीकारी शितोळे, कर्जत खालापूरच्या उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली परदेशी, कर्जतचे तहसीलदार अविऩाश कोष्टी, खालापूरचे तहसीलदार चप्पलवार आदी अधिकारी उपस्थित होते. या शिबारात कार्यकर्माचे सूत्रसंचलन व नियोजन दिशा केंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले यांनी केले. ग्राम पंचायतचे उपसंरपच रवींद्र भोइर, ग्राम पंचायत सद्स्य, ग्राम सेविका, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह दिशाच्या कार्यकर्त्या अनिता जाधव आदिनी शिबीर यश्स्वी करण्या साठी प्रयत्न केले.

तहसीलदांराच्या कामाची उपयुक्तता
कर्जत तालुक्यात कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून कार्यरत तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या रेशन व इतर योजनांच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या कामाचा उपस्थित महिलांनी विशेष उलेख करत सीता पवार म्हणाल्या की, तहसीलदार साहेबांनी मागच्या वर्षी व या वर्षी पण आमच्या भागात दाखले वाटपाचे कँम्प केले आहेत, काही लोकांना तर एका दिवसात रेशन कार्ड दिले आहेत.

First Published on: August 3, 2019 1:20 AM
Exit mobile version