आरे कारशेड प्रकरण: अहवालात दंडलय काय?

आरे कारशेड प्रकरण: अहवालात दंडलय काय?

आरे कारशेड प्रकरणी अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे.

मुंबईतील बहुचर्चित आरे कारशेडचा प्रश्न आता पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सर्वांचे लक्ष लागून राहिलेला अहवाल अखेर राज्य सरकारला प्राप्त झाला असून या अहवालात नेमके काय आहे, याकडे सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, याप्रश्नी आता विरोधक देखील आक्रमक होणार असून हा अहवाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

मुंबईतील आरे कारशेडसंदर्भातील समितीचा अहवाल जाहीर करण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात वरील माहिती समोर आली. हा अहवाल २८ जानेवारी रोजी प्राप्त झाला असून सध्या तो शासन स्तरावर तपासण्यात येत असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गेल्या अनेक महिन्यांपासून आरे कारशेडचा प्रश्न वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारशेडप्रकरणी मुंबईतील अनेकांनी आंदोलने देखील केली होती. त्यावेळी शिवसेनेने याप्रश्नी युती सरकारच्या विरोधात जावून या कारशेडला विरोध दर्शविला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. यासह हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी समितीची घोषणा करीत समितिला पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या अहवालासाठी आता भाजप आक्रमक होताना दिसत आहेत. भाजप या प्रकल्पासाठी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी तयारी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
.

First Published on: February 25, 2020 6:50 PM
Exit mobile version