पुढील सहा महिन्यात राज्यात नवीन उद्योग येतील याची मला खात्री, अब्दुल सत्तारांचा दावा

पुढील सहा महिन्यात राज्यात नवीन उद्योग येतील याची मला खात्री, अब्दुल सत्तारांचा दावा

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून राजकीय टीका केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात त्यांच्यावर विश्वास आहे. पुढील सहा महिन्यात राज्यात नवीन उद्योग येतील याची मला खात्री आहे, असा दावा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

…राज्यात नवीन उद्योग येतील याची मला खात्री

अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नरेंद्र मोदींवर माझा विश्वास आहे. पुढील सहा महिन्यात राज्यात नवीन उद्योग येतील याची मला खात्री आहे. हे दोन किंवा दीड महिन्यांचं सरकार नाहीये. तर मागील सरकारने अडीच वर्षांत सरकारने काय प्रयत्न केले आणि हा प्रकल्प गुजरातला कशामुळे गेला ? हे दोन्ही सरकारचे काम पाहिल्यानंतरच कळेल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

राज्यात उद्योग आणण्यासाठी आम्ही समर्थ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील राज्यात उद्योग आणण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचं म्हटलं आहे. अडीच वर्षांत शरद पवारांच्या तीन पक्षांच्या राजवटीत उद्योगाला पोषक वातावरण नव्हते, म्हणून इथून उद्योग गेले आहेत. आता उद्योग गेल्यानंतर हात चोळत बसण्यात अर्थ नाही. आम्ही बघू आता. समर्थ आहोत आम्ही. सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. बसायच्या आधीच ते दोन तासांचा अनुभव सांगतात. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती, असा टोला देखील नारायण राणेंनी शरद पवारांवर लगावला होता.

पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

शरद पवार यांनीही शिंदे सरकारवर हल्लाबोल केला होता. या प्रकल्पामध्ये पंतप्रधान लक्ष घालत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्यात सांगण्यात आले की, यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ सांगणे म्हणजे लहान मुलांची समजूत काढावी अशाप्रकारची समजूत काढली आहे असा टोला लगावतानाच यात महाराष्ट्राची प्रतिष्ठा नाही त्यामुळे यावर आता चर्चा नको. तळेगाव हा स्पॉट चांगला होता. आजुबाजुला चाकण हा ऑटोमोबाईलच्यादृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. चाकण, रांजणगाव हा परिसर ऑटोमोबाईलचा कॉरिडॉर करण्याचा प्रयत्न मी सत्तेत असताना झाला. सुदैवाने तिथे चांगल्या कंपन्या आल्या. त्यामुळे तो महत्वाचा भाग झाला होता. इथे प्रकल्प टाकला असता तर त्या कंपनीला सोयीचे झाले असते, असं पवार म्हणाले होते.


हेही वाचा: ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच आरोप करताहेत हे शहाणपणाचे लक्षण नाही : शरद पवार


 

First Published on: September 15, 2022 10:22 PM
Exit mobile version