ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे? किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे? किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोमय्या यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, या बंगल्यांच्या चौकशीसाठी किरीट सोमय्या आज १२ वाजता अलिबाग येथील CEO यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे आणि सोमय्या वाद पाहायला मिळणार आहे. (about 19 bungalow of Rashmi Uddhav Thackeray Kirit Somaiya will meet Alibagh CEO to ask question)

या वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या संबंधित 19 बंगल्यांवरून प्रश्न उपस्थि केले होते. अलिबाग येथील बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी 2009 मध्ये हे बंगले बांधले. 2014 मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतली घेतले, मात्र आता हे बंगले गायब केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

नेमके प्रकरण काय?

किरीट सोमय्यांच्या आरोपांनुसार, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग येथील कोर्लई ग्रामपंचायतीतील 19 बंगले स्वतःच्या नावावर करण्यासाठी पत्र लिहिले होते. हे पत्रदेखील किरीट सोमय्या यांनी माध्यमांमध्ये शेअर केले होते. त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर झाले. 2020 मध्ये त्यांनी 19 बंगल्यांचा मालमत्ता करही भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढेच नाही तर त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी आणि त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. हे बंगले रश्मी ठाकरे यांच्यासंबंधित असतानाही ते आता दिसत नाहीत, ते गायब केले आहेत का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण जोरदारपणे लावून धरले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे बंड तसेच, शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर यावरील आरोप-प्रत्यारोप शांत झाले होते.


हेही वाचा – खरी शिवसेना कोणाची! ठाकरेंची की शिंदे गटाची? निवडणूक आयोगात युक्तिवाद सुरु

First Published on: December 12, 2022 12:00 PM
Exit mobile version