जळगाव : एरंडोलजवळ भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

जळगाव : एरंडोलजवळ भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

जळगाव : एरंडोलजवळ भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

जळगाव जिल्हाच्या एरंडोल येथे भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकने प्रवासी कालीपिली गाडीला धडक मारली आहे. या अपघातात कालीपिली चालकाचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय कालीपिली गाडीत सहा प्रवाशांचा देखील जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धुळे शहराकडून जळगावच्या मार्गाला एक मालवाहू ट्रक (एम एच १५ जी ८४७४) धावत होता. दरम्यान, एरंडोल शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर ट्रकचा एक्सेल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी जळगावकडून एरंडोलच्या दिशेला सहा प्रवाशांनी भरलेली एक कालीपिली जात होती. या गाडीचा नंबर एमएच १९ वाय ५२०७ असे होते. मालवाहू ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे ती कालीपिली गाडीवर आदळली. या भीषण अपघातात कालीपिली गाडीचालकासह सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

First Published on: December 23, 2019 7:11 PM
Exit mobile version