घोरपडींचे ११७ कातडे जप्त

घोरपडींचे ११७ कातडे जप्त

ठाणे: वनविभागाने मुंबईतून एका वयोवृद्धाच्या राहत्या घरात व आजूबाजूला वाद्य बनविण्यासाठी मातीच्या मडक्यात लावलेली व सुटी अशी ११७ घोरपडींचे कातडे जप्त केले. या प्रकरणी ७२ वर्षीय भगवान सुदाम मांडळकार यांना अटक केले असून त्यांना येत्या ४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वनविभागाने दिली.

वनपरिक्षेत्र मंबई, वनपरिमंडळ अंधेरी मधील मौजे मालाड, सोमवार बाजार, कुंभारवाडा येथे घोरपडीचे कातडे असल्याची माहिती वनविभागाचे उप वनसंरक्षक (ठाणे) संतोष सस्ते यांना मिळाली. त्या माहितीनुसार शनिवारी (३१ डिसेंबर) धाड टाकण्यात आली. यावेळी अटकेत असलेल्या मांडळकार यांच्या राहत्या घरात व घराचे आजूबाजूस वाद्य बनविण्याकरीता मातीच्या मडक्यास लावलेली व सुटी अशा एकूण ११७ घोरपड या वन्यप्रजीवाचे कातडे मिळून आले.

त्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. तसेच त्यांना न्यायालयात हजर केल्यावर येत्या ४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तसेच त्यांनी हे कातडे कुठून आणले याचा शोध चौकशीत घेत असल्याची माहिती वनविभागाने दिली. ही कारवाई उपवनसंरक्षक (ठाणे ) संतोष सस्ते व सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शना खाली वनक्षेत्रपाल (मंबई) राकेश भोईर, वनपाल (अंधेरी) रोशन शिंदे, वनरक्षक (गोरेगाव) सुरेंद्र पाटील, वनरक्षक (भांडूप) मनिषा महाले, टेल्स ऑफ होप अॅनिमल रेस्क्यू फाउंडेशन मुंबईचे अक्षय चंद्रन व गणेश दाभाडे यांनी केली आहे.

First Published on: January 1, 2023 10:29 PM
Exit mobile version