काळ्या काचांच्या वाहनांवर होणार कारवाई

काळ्या काचांच्या वाहनांवर होणार कारवाई

काळ्या काचांच्या वाहनांवर होणार कारवाई

वाहनांच्या काचांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावून काचा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता धडक कारवाई करण्यात येणार आहे. वाहनांच्या काचा पारदर्शक असाव्यात, असा नियम असून देखील मोठ्या प्रमाणात अति महत्त्वाच्या व्यक्ती खिडक्यांना काळ्या फिल्म्स लावतात. मात्र, आता या काळ्या फिल्म्स लावणाऱ्या वाहनांच्या फिल्म्स काढून त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात यावी, असे पत्रक महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालकडून राज्यातील पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले आहे. या कारवाईची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी असा आदेश पत्रकात देण्यात आला आहे.

वाहनांच्या काचांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावणाऱ्यांवर कारवाई

अनेकदा बऱ्याच व्यक्ती वाहनांच्या खिडक्यांवर काळ्या रंगांच्या फिल्म्स लावून पारदर्शकता झाकण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आता अशा वाहनांना फटका बसणार आहे. काळ्या रंगाच्या फिल्म्स लावून काचा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांवर धडक कावाई करण्यात येणार आहे. वाहनांच्या काचा पारदर्शक असाव्यात, असा नियम असून मागील आणि बाजूच्या काचांना काही अंशी दिलासा दिला जातो. परंतु अत्यंत दाट काळ्या रंगाच्या काचा बसवून किंवा काचांवर फिल्म चिकटवून गाड्या अपारदर्शक करण्याचा प्रयत्न वाहनचालकांकडून केला जातो. अशा वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात यावी, असे पत्रक महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालकडून राज्यातील पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले आहे. ही कारवाई अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, असा आदेश पत्रकात देण्यात आला आहे.


हेही वाचा – अधिवेशनाला येणाऱ्या आमदारांना चोरीचा फटका; एक्स्प्रेसमधून पत्नीची पर्सच पळवली

हेही वाचा – वादग्रस्त ‘डेलॉईट’ प्रकरणी विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव; ‘आपलं महानगर’ने केली पोलखोल


 

First Published on: June 25, 2019 2:35 PM
Exit mobile version