रजनीश शेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक; जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास

रजनीश शेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक; जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास

रजनीश शेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक; जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे कोण आहेत रजनीश शेठ आणि त्यांची पोलीस कारकीर्दीतील कामगिरी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊ.

रजनीश शेठ यांची कारकीर्द

29 डिसेंम्बर 1963 रोजी रजनीश शेठ यांचा जन्म झाला असून रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 25 ऑगस्ट 1988 ला पोलीस दलात त्यांची भरती झाली. रजनीश शेठ यांचं शिक्षण बी.ए.ऑनर्स (एल एल बी) झालं आहे. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. त्यानंतर रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही शेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.आणी नुकतीच त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.दरम्यान, शांत स्वभावाचे अधिकार म्हणून रजनीश शेठ यांची ओळख आहे. रजनीश शेठ आतापर्यंत कुठल्याच वादात सापडलेले नाहीत.


 

First Published on: March 17, 2021 7:46 PM
Exit mobile version