मुंबई महापालिकेच्या शाळेत केम्ब्रिज बोर्डातून घेता येणार शिक्षण, आदित्य ठाकरेंची घोषणा

मुंबई महापालिकेच्या शाळेत केम्ब्रिज बोर्डातून घेता येणार शिक्षण, आदित्य ठाकरेंची घोषणा

मुंबई महापालिकेच्या शाळेत केम्ब्रिज बोर्डातून घेता येणार शिक्षण, आदित्य ठाकरेंची घोषणा

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमाद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा पाहता अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये दाखल केलं आहे. यामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वर्षानुवर्षे घटत होती. विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी महापालिका शाळांमध्ये सीबीएसई, आयसीएसई शाळा सुरु करण्यात आल्या आहेत तर आता मुंबई महानगपालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्डाचे शिक्षण घेता येणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात शाळा सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जगातलं सर्वोत्तम शिकण्याचं माध्यम हे केंब्रिज बोर्ड आहे. ही जगातील सर्वोत्तम शिक्षण पद्धती मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आणणार आहोत. शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करुन ही शिक्षण पद्धती महाराष्ट्रात कशी आणता येईल यावर भर देणार आहोत. आईसीएसई बोर्ड, सीबीएसई की केंब्रिजमध्ये जायचं आहे याची निवड करण्याची मुभा असणार आहे. पुढचे दोन महिने यावर चर्चा करुन किती शाळा सुरु करु शकतो याबाबत निर्णय घेणार आहे. तसेच सुरुवातीला एक शाळा सुरु करण्यात आली तरी प्रत्येक वॉर्डमध्ये एक शाळा सुरु करता येईल का? जेणेकरुन महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येऊ शकतो असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

केंब्रिज बोर्डाचा महापालिकेतील विद्यार्थ्यांना करिअर, रिसर्चसाठी भविष्यात फायदा होणार आहे. २०१३ मध्ये आपण व्हर्चुअल क्लासरुमची संकल्पना महापालिका शाळांमध्ये प्रत्यक्षात सुरु केली. यानंतर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी काळा शाळांची संलग्नता करण्यात आली होती. तशी केंब्रिज बोर्डासोबत संलग्नता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शाळांचे नाव बदलणार

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबत नागरिकांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी मुंबई पालिका शाळांच्या नावात बदल करण्यात येणार आहे. मुंबई पब्लिक स्कूल असे नाव महापालिका शाळांना देण्यात येणार आहे. या शाळांचा नवा लोगोही तयार करण्यात आला आहे.

First Published on: September 8, 2021 4:02 PM
Exit mobile version