दसरा मेळावा शिवसेनेचा आहे शिवसेनेचाच राहणार : आदित्य ठाकरे

दसरा मेळावा शिवसेनेचा आहे शिवसेनेचाच राहणार : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेच्या 40 आमदरांनी बंडखोरी करत शिंदे गटात सहभाग घेतला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केले आहे, तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण दरवर्षी शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा कोण? घेणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी “दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार”, असे म्हटले. (aditya thackeray talk on dasara melava 2022 targeting cm eknath shinde group)

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले. ”मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण तुम्हाला माहित आहे जे गद्दार सरकार आले आहे. ते दडपशाहीचे सरकार आहे. मुंबईत मनपात बदल्यांचे सरकार झाले आहे. त्यांनी परवानगी दिलेली नाही. शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होत आला आहे. जनता देखील हे बघत आली आहे. गद्दार हे खोके सरकार पुढे नेत आहे. खोके सरकारच्या मागे कोण होते, ते आता पुढे यायला लागले”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

“दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देत आहोत. पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचे सरकार आहे. ओरिजनल शिवसेना कुणाची हे तुम्हाला माहित आहे. जनता आमच्या सोबत आहे आणि सोबत राहणार”, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

यंदाचा शिवसेना मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी मागण्यात आली आहे. मात्र अद्याप पालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा शिवसेना करणार की शिंदे गट, अशी चर्चा साध्य राजकीय वर्तुळात रंगली आहे.


हेही वाचा – सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…मनसेची शिवसेनेवर खोचक टीका

First Published on: August 27, 2022 7:33 PM
Exit mobile version