आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेक प्रकरणात औरंगाबाद पोलिसांचा मोठा खुलासा

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेक प्रकरणात औरंगाबाद पोलिसांचा मोठा खुलासा

या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांववर निष्काळजीपणाचा आरोप होत असतानाच दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी मोठा खुलासा केलाय.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी त्यांच्या याच ‘शिव संवाद’ यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. तर आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने केला आहे. दरम्यान यावर आता औरंगाबाद पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. आदित्या ठाकरेंच्या ताफ्यावर एकही दगडफेक झाली नसल्याचा दावाच औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केलाय.

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगावात आदित्य ठाकरेंची सभा झाली. यावेळी काही लोकांनी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला होता. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. या प्रकरणी अंबादास दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये पोलिसांकडून कसूर झाल्याचा आरोप केला. तसंच या प्रकरणाची गांभीर्यानं नोंद घेण्यासाठी एक विनंती पत्र पोलिस महासंचालकांना धाडलं. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पुढे येऊन मोठा दावा केलाय.

एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना औरंगाबाद पोलिसांनी ही मोठी माहिती दिली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप होत असतानाच दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दगडफेक झालीच नसल्याचं सांगितलं. “आदित्य ठाकरे यांच्या सभेस्थळी थोड्या प्रमाणात गोंधळ झाला होता, यात एक कॅमेरामनही जखमी झाला होता. जर दगडफेक झाली असती तर तिथे गोंधळ आणखी वाढला असता”, असं देखील पोलीस म्हणाले. आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर ते त्यांच्या ताफ्यासह सुखरूप निघून गेले, असं देखील पोलीस म्हणाले.

जर अंबादास दानवे यांचा दगडफेक झाली असल्याचा दावा असेल तर आम्ही त्यादृष्टीने तपास सुरू करू. गोंधळ झला होता, पण एकही दगडफेक झाली नाही. आमच्या प्राथमिक चौकशीमध्ये अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. असं देखील औरंगाबाद पोलिसांचं म्हणणं आहे.

First Published on: February 8, 2023 1:50 PM
Exit mobile version