‘बकर्‍या आंदोलन’ करणार्‍या ‘त्या’ विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजनच

‘बकर्‍या आंदोलन’ करणार्‍या ‘त्या’ विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजनच

नाशिक : शाळा सुरु होण्यासाठी ‘दप्तर घ्या, शेळ्या द्या’ असे आंदोलन करणार्‍या इगतपुरी तालुक्यातील दरेवाडीची शाळा बुधवारी सुरु झालेली असताना शिक्षण विभागाने मात्र त्या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, शाळा पूर्ववत सुरू करण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. तसेच शाळा बांधकामसाठी प्रस्ताव देखील पाठविला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले.

शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी या शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. या विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करुन त्यांना सायकल देण्याचा निर्णय घेतला. इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी (काळुस्ते) येथील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळा मागील महिन्यात बंद करण्यात आली. केंद्रप्रमुख माधव उगले यांना मारहाण झाली. तेव्हापासून ही शाळा बंद आहे. ही बंद शाळा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी दरेवाडी गावापासून मोर्चा काढत मगंळवारी जिल्हा परिषदेवर धडकले. या आंदोलनाची दखल घेत, शिक्षणाधिकारी कनोज यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या समवेत बुधवारी दरेवाडी येथील शाळेला भेट दिली. त्यावेळी शाळेसंदर्भात शहानिशा करत, ग्रामस्थांशी संवाद साधला.

मुळच्या दरेवाडी शाळेत दाखल असलेले ४३ विदयार्थी दरेवाडी किंवा नजीकच्या शाळेत जाण्यास इच्छूक नाहीत. त्यांच्यासाठी वस्तीमधील पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरत्या स्वरुपात अध्यापनाची सोय केलेली होती. ते आता अध्यापनास अनुकूल वातावरण नाही. विदयार्थ्यांना अध्यापनासाठी एकच शिक्षक असल्याने परिपूर्ण तयारी करुन घेणे अडचणीचे आहे. यासाठी भामधरण वस्तीवरील ४३ विदयार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन केले जाणार आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सायकल देण्याचा प्रयत्न केला जाईल

First Published on: October 13, 2022 12:53 PM
Exit mobile version