जितेंद्र आव्हाडांविरोधात अ‍ॅट्रोसिटीची दाखल करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी

जितेंद्र आव्हाडांविरोधात अ‍ॅट्रोसिटीची दाखल करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी तक्रार केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल, लोकायुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे ही तक्रार सादर केली आहे. अनुसुचित जातीतील वर्गाचा अपमान केल्याचा सूर सदावर्तेंच्या तक्रारीत आहे. त्यामुळेच आव्हाडांविरोधात अॅट्रोसिटीचे प्रकरण दाखल करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पाहता जातीय दंगल भडकवण्याच्या उद्देशाने गलिच्छ राजकारण करण्याच्या मानसिकतेत आव्हाड आहेत. त्यामुळे आव्हाडांना अनुसुचित जातीच्या वस्त्यांमध्ये जाण्यास प्रतिबंध करावा असेही या तक्रारीत म्हटले आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दलित, महार हे आक्षेपार्ह शब्द जे न्यायालयाने प्रतिबंध केले आहेत, अशा शब्दांचा सार्वजनिक रित्या वापर केला आहे. समूहाचा अपमान करतानाच दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या आकांक्षेने त्यांनी ठाणे येथील सावित्रीच्या लेकी कार्यक्रमात हे भाष्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने झालेला हा गंभीर अपराध आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅड सदावर्ते यांनी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांची या वक्तव्याच्या प्रकरणात चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. मंडल आयोगाच्या मागण्यांसाठी लढायचे होते तेव्हा ओबीसी समाज मैदानात लढायला नव्हता. लढायला महार समाज होता. कारण त्यावेळी ओबीसींना लढायचे नव्हते. ओबीसींवरील ब्राम्हणवादाचा पगडा इतका होता की, ते स्वतःला श्रेष्ठ समजत होते. पण आता आरक्षणासाठी सर्व पुढे येतात. नुसते घरात बसून वॉट्स एप करून चालणार नाही. तर रस्त्यावर येऊन केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.


 

First Published on: January 4, 2022 10:09 PM
Exit mobile version