कोकणातील पराभवानंतर राष्ट्रवादीचा भाजपला खोचक सल्ला; EVM ऐवजी…

कोकणातील पराभवानंतर राष्ट्रवादीचा भाजपला खोचक सल्ला; EVM ऐवजी…

Amol Mitkari on EVM | मुंबई – विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत राज्याच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजाविलेल्या शेकापला मोठा धक्का बसलाय. या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले असून या निकालाने कोकणात राजकीय चेहराच बदलला आहे. मात्र, यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका भाजपने EVM ऐवजी बॅलेट वर घेण्याचे औदार्य दाखवावे, असं आवाहन अमोल मिटकरी यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “कोकण पदवीधर मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले. प्रथम त्यांचे अभिनंदन. EVM पेक्षा बॅलेटवर सुद्धा भाजप निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झाले. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका भाजपाने EVM ऐवजी बॅलेटवर घेण्याचे औदार्य दाखवावे.”


दरम्यान, भाजपा EVM च्या जोरावर निवडणुका जिंकते असा आरोप सातत्याने केला जातो. त्यामुळे EVM पेक्षा बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याच्या मागणीला दर निवडणुकीत जोर धरतो. त्यातच, विधान परिषदेच्या निवडणुका बॅलेटवर झाल्या. या निवडणुकीत विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाने शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत विजयी घोडदौड केली. त्यामुळे भाजपाने यापुढेही बॅलेटवर पेपरवरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी पुन्हा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.

हेही – कोकणातील पराभवानंतर राष्ट्रवादीचा भाजपला खोचक सल्ला; EVM ऐवजी…

भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २३ हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. पहिल्या फेरीतच त्यांना ६० टक्के मतं मिळाल्यानंतर त्यांची घोडदौड विजयाच्या दिशेने सुरू झाली होती. याच पहिल्या फेरीत शेकापचे बाळाराम पाटील यांना केवळ ४० टक्केच मतं मिळाली होती. त्यामुळे पहिल्याच फेरीत शेकापचा बालेकिल्ला पुरता ढासळला गेला. विशेष म्हणजे बाळाराम पाटील यांना एकूण २३ संघटनांनी पाठिंबासुद्धा दिला होता. इतकंच नव्हे तर दोन केंद्रीय मंत्री, चार आमदार आणि चार खासदार बाळाराम पाटील यांच्यासाठी रिंगणात उतरले होते. तरीही बाळाराम पाटील यांच्या पारड्यात अपयश पडल्याने इथल्या चर्चांना उधाण आलंय.

विजयानंतर भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की….

नेरूळ इथल्या आगरी कोळी भवन इथे ही मतमोजणी झाली. कोकण शिक्षक मतदार संघात विजय मिळवल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, “कोकण मतदारसंघातील शिक्षकांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार म्हात्रे यांनी यावेळी मानले. या मतदारसंघात आजपर्यंत फक्त शिक्षक आमदार झाले आहेत. तीच परंपरा शिक्षकांनी राखल्याचा दावा म्हात्रे यांच्या बंधूंनी विजयानंतर केला आहे.”

First Published on: February 2, 2023 3:55 PM
Exit mobile version