तीन वर्षांनंतर उद्धव ठाकरेंना जनतेच्या भावना समजल्या

तीन वर्षांनंतर उद्धव ठाकरेंना जनतेच्या भावना समजल्या

नाशिक : अधिवेशनात बोलणारे अडीच-तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असल्यामुळे त्यांना जनतेचा आवाज ऐकू आला, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना लगावला. सोमवारी (दि.२६) नाशिक दौर्‍यावर आलेल्या शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

उध्दव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न उपस्थित केला. यावर शिंदे म्हणाले की, अधिवेशनात बोलणारे अडीच तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील. सीमा वादावर सरकार गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी फार काळजी करू नये, असा टोलाही लगावला. चार भिंतींच्या आत बसले, घरात बसलो तर लोकांच्या भावना कार्यकर्त्यांच्या भावना कशा कळणार? लोकांच्या, कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर काम करावे लागते. आत्तापर्यंत अनेक सत्तांतरे झाली पण हे सत्तांतर ऐतिहासिक होते. 50 आमदारांसह 13 खासदार का गेले, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. लोक का चालले आहेत, का चुकतंय हे तपासायला हवे, असा सल्लाही शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

आरोप करण्यापलिकडे कामच नाही

बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा लोकांचा ओढा वाढत चालला आहे. येणार्‍या काळात अनेक जण येण्याची चूक आहेत. त्यामुळे विरोधकांकडे प्रश्नच उरलेले नसल्याने काहीतरी मुद्दे काढायचे अभ्यास करायचा नाही फक्त बेछूट आरोप करत सुटायची इतकेच त्यांचे काम आहे. आरोप करण्यापलीकडे विरोधकांकडे काहीच काम नसल्याचे म्हणत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

बघा काय म्हणाले श्रीकांत शिंदे..?

First Published on: December 27, 2022 1:50 PM
Exit mobile version