Coronavirus : लॉकडाऊनमुळे कुलाब्यापासून चेंबूरपर्यंत हवेची गुणवत्ता उत्तम!

Coronavirus : लॉकडाऊनमुळे कुलाब्यापासून चेंबूरपर्यंत हवेची गुणवत्ता उत्तम!
मुंबईला गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचा विळखा बसला होता. मात्र, आता याच मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली आहे. राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून, सगळीकडे लॉकडाऊन पाहायला मिळत आहे. याच लॉकडाऊनमुळे सतत धावणारी मुंबई देखील शांत झाली आहे. आणि याचेच काही सकारात्मक परिणाम देखील जाणवू लागले आहेत. याच लॉकडाऊनमुळे मुंबईतील प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. तशी आकडेवारी सफर या संस्थेने दिली आहे. आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
मार्च महिन्यातील नोंदीनुसार मुंबईत माझगावमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय वाईट होती. माझगावमध्ये पीएम २.५ प्रदूषणाचे प्रमाण (प्रत्येक घनमीटर हवेतील तरंगते धुलिकण) ३८० होते, तर नवी मुंबई, वांद्रे कुर्ला संकुलात तर हवेची गुणवत्ता तर अधिक वाईट होती.
सफर या हवामान प्रणालीनुसार नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात हवेच्या गुणवत्तेचा सर्वाधिक निर्देशांक २८१ पर्यंत पोहोचला होता. बीकेसीमध्ये हा निर्देशांक ३४२ होता तर नवी मुंबईमध्ये हा निर्देशांक ४०४ होता. सातत्याने अशा हवेमध्ये श्वासोच्छवास करून मुंबईकरांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची भीती आहे. २९ दिवसांपैकी १० दिवस मुंबईतील हवा वाईट स्वरूपाची होती तर बीकेसीमध्ये एकूण २४ दिवस हवेची गुणवत्ता घसरलेली होती. नवी मुंबईत तर एकूण २७ दिवस प्रदूषित हवेचा सामना करावा लागला. दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई आणि परिसरात चिंतेचे वातावरण असले तरी लॉकडाऊनमुळे मुंबईतील प्रदूषणात घट होऊन हवेची गुणवत्ता सुधारली आहे.

यामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली 

लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील मोटारींची संख्या कमी झाली असून, इमारतींची बांधकामे, रस्त्यांची बांधकामे बंद आहेत. त्यामुळे मुंबईतील कार्बन व धुळीचे प्रमाण घटले आहे. मुंबईतील सर्वाधिक प्रदूषित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूर आणि वांद्रे कुर्ला संकुलातील हवेची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे. लॉकडाऊनमुळे भांडुप, कुलाबा, माझगाव, वरळी, बोरिवली, बीकेसी, चेंबूर आणि अंधेरीतीलही हवेची गुणवत्ता उत्तम आणि समाधानकारक आहे.

प्रत्येक घनमीटर हवेतील तरंगते धुलिकण (पीएम 2.5 चे प्रमाण मायक्रोग्रॅममध्ये) 

मुंबई सरासरी – ७६
भांडूप – ६५
कुलाबा – ५६
मालाड – ७०
माझगाव – ४९
वरळी -५९
बोरीवली – ९३
चेंबूर – ४२
वांद्रे कुर्ला संकूल – ६१
अंधेरी – ५७
नवी मुंबई – १२०

हवेची श्रेणी 

०  ते ५०  – चांगली
५०  ते १००  – समाधानकारक
१००  ते १५०  – मध्यम
First Published on: April 17, 2020 3:29 PM
Exit mobile version