महाराष्ट्रातील वाढत्या दंगलींवरून अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले

महाराष्ट्रातील वाढत्या दंगलींवरून अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले

यंदाच्या वर्षी रामनवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी नगर मध्ये एक दंगल उसळली. शुल्लक कारणावरून घडलेली घटना जाळपोळ आणि हाणामारीमध्ये बदलली. त्यानंतर राज्यात बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या. ह्या घटना शांत होत आहेतच की नाही तर मागील आठवड्यात अकोल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी दोन गटांमध्ये वाद झाला. सोशल मीडियाच्या पोस्टवरून हा वाद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. परंतु हा वाद इतका विकोपाला गेला की दोन गटात झालेल्या या वादामुळे जिल्हाधिकाऱ्यांना शहरांमध्ये कलम 144 लागू करावे लागले. त्यानंतर एका दिवसाच्या आत पुन्हा एकदा नगरमध्ये शेवगाव येथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्या ठिकाणी देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात वाढलेल्या हिंसेच्या घटनांमुळे राज्यातील वातावरण सध्या तापलेले पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसारखं निर्भीड वागावं ही अपेक्षा, संजय राऊतांचा सल्ला

राज्यात गेल्या काही महिन्यात जातीय उभ्या राहिल्याचे पाहायला मिळत आहेत. सर्वधर्म समभाव नष्ट होत चालला आहे. त्यामुळे याचा फायदा राजकारणी घेताना दिसून येत आहेत, मात्र सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

फडणवीस सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष देखील पूर्ण झालेले नाही. पण राज्यात घडणाऱ्या हिंसेच्या घटनांमुळे आता सरकारला विरोधकांकडून लक्ष केले जात आहे. अजित पवारांनी देखील दंगल प्रकरणांवरून आता शिंदे फडणवीस सरकारला चांगले सुनावलेले आहे. (Ajit Pawar briefed Devendra Fadnavis on the growing riots in Maharashtra) राज्यातील वाढत्या दंगल घटनांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आदरयुक्त भीती राहिल असा गृहखात्यावर वचक ठेवला पाहिजे. दंगली वाढतील असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. कोणत्याही जाती, धर्म आणि पंथामध्ये दुसऱ्याचा द्वेष आणि अनादर करावा असं कृत्य करु नये.”

तसेच, “आज काल काय वक्तव्ये केली जात आहेत हे आपण पाहतो. महाराष्ट्रामध्ये आज का दंगली होत आहेत? सत्ताधारी राज्यकर्ते जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारीवरुन लक्ष विचलित करत आहे. त्यांनी मंदिरामध्ये जाताना पोशाखावरुन सुरु असलेल्या वादावरुनही टीका केली. ते म्हणाले तो पोशाख आहे, हाप पॅन्टमध्ये दर्शन घेतले तर कुठे बिघडले? कोणत्या रस्त्याने महाराष्ट्र घेऊन चालला आहात?” असा प्रश्न देखील अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

First Published on: May 20, 2023 5:01 PM
Exit mobile version