राजू शेट्टी यांचा पत्ता कट, हेमंत टकलेंना संधी?, अजित पवार म्हणाले…

राजू शेट्टी यांचा पत्ता कट, हेमंत टकलेंना संधी?, अजित पवार म्हणाले…

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ९ महिने उलटले तरी राज्य मंत्रिमंडळाने सुचवलेल्या सदस्यांची विधान परिषदेवर नियुक्ती केलेली नाही. यासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान, मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नावाला हरकत असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना जी व्यक्ती अलीकडची निवडणूक हरली आहे, त्या व्यक्तीची नियुक्ती होत नाही, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे याची माहिती घेऊन त्यानंतर पुढील निर्णय घेणार असं अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, राजू शेट्टी यांचं नाव रद्द करुन राष्ट्रवादीने हेमंत टकले यांचं नाव दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

राजू शेट्टी यांचा पत्ता कट आणि हेमंत टकले यांना संधी याही बातम्या कुठून येतात कळत नाही, त्यामुळे बातम्या देताना काळजीपूर्वक द्या, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

कोण आहेत हेमंत टकले?

२००८ ते २०१४ आणि २०१४ ते २०२० विधानपरिषद सदस्य

अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष

कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्राचा दांडगा अनुभव

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या संस्थांसाठी योगदान

 

First Published on: September 3, 2021 6:29 PM
Exit mobile version