५ दिवसांत १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण – अजित पवार

५ दिवसांत १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण – अजित पवार

राज्यात कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉनचे संकट घोंघावत आहे. राज्य सरकारने काल (शुक्रवार) पासून कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. कोरोनामुक्त करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नवा संकल्प आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशीही राज्यात ८ हजाराहून कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर ५ हजार रूग्ण केवळ मुंबईत सापडले आहेत. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही कठोर निर्बंध जारी केले असून कार्यक्रमांना उपस्थिती लावणाऱ्यांची संख्या मर्यादित केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची बैठक

कोरेगाव-भिमा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या संकल्पाविषयी राज्याची भूमिका स्पष्ट केली आहे. नव्या वर्षात राज्याला कोरोनामुक्त करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली होती. रूग्णांची संख्या वेगाने वाढू लागली तर नाईलाजाने कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ शकते. तशी येऊ नये, म्हणून सगळ्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असं अजित पवार म्हणाले.

अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांना कोरोनाची लागण 

राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना ५ दिवसांत १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली. तसेच कालच राज्य सरकारने कोरोनाच्या बाबतीत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या काळात १० मंत्र्यांना आणि २० पेक्षा जास्त आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहीजे, असं अजित पवार म्हणाले.

जगभरात अमेरिका आणि इंग्लंडसह कोरोनाचे लाख रूग्ण सापडत आहेत. दुसऱ्या लाटेची आपण खूप मोठी किंमत मोजली असून प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपला, काय आहे वानखेडेंची कारकीर्द?


 

First Published on: January 1, 2022 10:52 AM
Exit mobile version